'आठवणींचा धांडोळा' या कथासंग्रहात वैयक्तिक अनुभव, सामाजिक निरीक्षण, व्यक्तिवैविध्य, त्यांचे गुण व अवगुण तसेच समाजातील चालीरीती रुढी परंपरा, अज्ञान अंध:श्रद्धा ढोंगीपणा, औदार्य, आधुनिक फॅशन, जिवावर बेतणारे प्रसंग, गरिबांचे शोषण, समाजसेवा, करणा-या काही व्यक्तींचे जीवन व कर्तव्यचुकार व्यक्तींच्या करामती तसेच सुसंस्कृत लोकांची अस्मिता इ. विषयांतर्गत आलेल्या कथांचे सादरीकरण करून त्यातून वाचकांचे मनोरंजन केलेले आहे, तर काही ठिकाणी सत्याचा साक्षात्कार करून दिलेला आहे.
प्रस्तुत कथासंग्रहातील कथांना सत्यतेचा आधार आहे. तसेच त्या अनुभवसिद्ध आहेत त्यामुळे सर्वच वाचकांना आवडतील याची खात्री आहे.